मुंबई : आरोग्याच्या समस्या या कधी ना कधी उद्भवत असतातच. याला कोणतीही वयोमर्यादा नसते. महत्वाची गोष्ट म्हणजे जर आरोग्यावर (health) परिणाम होणार असतील तर त्याची लक्षणे शरीरावर (boady) दिसतात. लक्षणे दिसायला लागताच समजून जात की आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहेत. आता उदाहरणार्थ आपण जर हार्टअटॅकचा (heart attack) विचार केला तर हल्ली अगदी 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींना सुद्धा हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु हार्ट अटॅक येण्यासाठी कारणीभूत ठरत ते आपले दैनंदिन रुटीन, कामाचा व्याप आणि ताण-तणाव, आपली आहार पद्धती कारणीभूत आहे.
परंतु एक गोष्ट अशी आहे की, हार्टअटॅक येण्याअगोदर जवळजवळ एक महिना आधी शरीरामध्ये काही संकेत दिसून येतात. ज्यामुळे आपण नक्कीच आपण हार्ट ॲटॅक पासून वाचू शकतो. पण त्यासाठी त्या संकेताकडे लक्ष द्यायला हवे. हार्टअटॅकमध्ये काही जणांना 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ छातीमध्ये दुखते तर काही लोकांना हलक्या वेदना होतात. परंतु काही जणांना तीव्र स्वरूपाच्या वेदना देखील जाणवतात. त्यामुळे या लेखात आपण हार्ट ॲटॅक येण्याआधी कुठल्या लक्षणे दिसतात हे आपण पाहू.
PM Modi Birthday: शाहरुख खान ने मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाला…
हार्टअटॅकची काही सामान्य लक्षणे
हार्टअटॅकच्या लक्षणांमध्ये अस्वस्थता वाटणे, छातीमध्ये दुखणे किंवा दरदरून घाम येणे इत्यादींचाचा समावेश होतो. परंतु बऱ्याचदा आपण पेन किलर घेऊन वेदना कमी करण्याचा आपला प्रयत्न असतो. पण काहीवेळा हा एक सौम्य हृदय विकाराचा झटका असू शकतो. तसेच जेव्हा चक्कर येऊन खाली पडणे किंवा मृच्छा येणे किंवा छातीत तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे इत्यादी लक्षणे जाणवतात तेव्हा तीव्र स्वरूपाचा झटका येतो.
दिलासादायक! लम्पीने संक्रमित गुरांच्या उपचाराचा खर्च महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग करणार; वाचा सविस्तर
महत्वाची बाब म्हणजे छातीत दुखणे, चक्कर येणे, अनियंत्रित ब्लडप्रेशर, श्वास घ्यायला अडचण होणे, कायमच थोडे जरी काम केले किंवा चालले तरी थकवा जाणवणे, छातीत धडधड वाढणे इत्यादी सामान्य लक्षणांकडे देखील दुर्लक्ष करू नये. कारण ही लक्षणे हार्टअटॅकची असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसून येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घेणे खूप आवश्यक आहे.