महिला आणि पुरुष क्रिकेटर्सना मिळणार समान मानधन, जय शाह यांची घोषणा

Female and male cricketers will get equal remuneration, Jai Shah announces

मुंबई : बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना यापुढे समान मानधन दिलं जाणार असल्याची घोषणा शाह यांनी केली आहे. जय शाह यांनी ट्वीट (Tweet) करत ही घोषणा केली आहे.

शेळी पालनाचा विचार करताय?, आता १० शेळ्या पाळण्यासाठी मिळणार ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

ट्विट करत जय शहा यांनी सांगितले की, “बीसीसीआयने (BCCI) भेदभाव दूर करण्याच्या हेतूने पहिलं पाऊल टाकल्याची घोषणा करण्यात मला आनंद होतोय. बीसीसीआयशी करारबद्ध असणाऱ्या महिला खेळाडूंसाठी आम्ही समान मानधन धोरणाची अमलबजावणी करत आहोत. स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगामध्ये आपण प्रवेश करत आहोत. महिला आणि पुरुष खेळाडूंची मॅच फी यापुढे समान असणार आहे”, अशी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘या’ योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये; वाचा सविस्तर

“पुरुषांप्रमाणेच महिला खेळाडूंना देखील समान मानधन दिलं जाईल. त्यानुसार कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख आणि टी-२० साठी तीन लाख मानधन असेल,” अशी देखील माहिती जय शहा यांनी ट्विट करत दिली आहे.

मोठी दुर्घटना! मुंबईतील गिरगावमधील गोदामात आग लागून १४ गाड्या जळून खाक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *