जेवणानंतर लोक आवडीने बडीशेप (fennel) खातात किंवा इतर वेळी देखील खूप वेळा खातात. बडीशेप खाल्ल्याने वजन कमी (weight loss) होते असे म्हंटले जाते. मात्र बडीशेप खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे (Advantages) आहेत. जाणून घेऊयात बडीशेप खाण्याच्या फायद्यांबद्दल अधिक …
काहीतरी शिजतंय? मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन नाना पाटेकर यांनी केली ‘या’ विषयावर चर्चा
१) हाडे मजबूत करते: बडीशेप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडांची रचना आणि ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये फॉस्फेट, कॅल्शियम, लोह, झिंक, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ‘के’ यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर बडीशेप खाल्ल्याने हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो.
२) रक्तदाब कमी करण्यास मदत होते: बडीशेप खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात. हे घटक नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करू शकतात. तसेच यामध्ये असणाऱ्या नायट्रेट्समुळे देखीव रक्तदाब कमी होतो.
मुंबईत सलमान खान बांधणार 19 मजली आलिशान हॉटेल, काय काय असेल यात? वाचा सविस्तर
३) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. हे फायबर रक्तातील एकूण सीरम कोलेस्टेरॉल आणि लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मल्चिंग पेपरसाठी मिळणार 50 टक्के अनुदान; असा करा अर्ज