उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh ) गुलहरिया गाजीपूर गावातील बोटनपुरवा परिसरामध्ये पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या जोरदार भांडणनंतर धक्कादायक घटना अशी घडली की, पतीला या भांडणामुळे जीव गमवावा लागला. हे भांडण मोबाईलमुळे झाले होते. या भांडणामुळे पत्नी बहिणीच्या घरी निघून गेल्यामुळे नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
फ्री मध्ये करा घरबसल्या आधार कार्ड अपडेट, १५ जून पर्यंत शेवटची संधी
हनुमान कश्यप असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हनुमानचा दोन दिवसापूर्वी मोबाईल हरवला होता. मोबाईलचा शोध घेतल्यानंतर त्यांनी पत्नीला विचारले. हनुमानला असे वाटत होते, की त्याच्या पत्नीला मोबाईलविषयी माहिती आहे. परंतु पत्नी सांगत नसल्याने त्यांच्या दोघांमध्ये जोरदार कडाक्याचं भांडण झाले. त्यानंतर पत्नी बहिणीच्या घरी निघून गेली.
एका युजरला Sorry म्हणतं ChatGPT ठरली अपयशी, युजरने स्क्रीनशॉट केला व्हायरल!
हनुमान घरामध्ये एकटा असल्याने शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. हनुमानचा मृतदेह छताला लटकताना पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यानंतर हनुमानचा भाऊ संतारामने याची माहिती पोलिसांना कळवली. हनुमानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ( Autopsy ) पोलिसांनी पाठवला. हुजूरपुर ( Hujurpur ) ठाण्याचे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंह या घटनेची माहिती घेत होते. पत्नी सोबत झालेल्या वादामुळे हनुमान यांनी गळफास घेतला असे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंह यांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी पाठवलेल्या मृतदेहाची तपासणी झाल्यानंतर व अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल.