औरंगाबाद: शनिवारी संध्याकाळी आठ वाटता शहरातील भानुदास चव्हाण सभागृहात सुमधुर हिंदी चित्रपट गितांचा सुरदरबार संपन्न झाला. यामध्ये २१ संगीतकारांच्या २१ रागांवर आधारित सदाबहार चित्रपट गीतांचे उपस्थित गायकवृंदांकडून सादरीकरण करण्यात आले. प्रसाद साडेकर निर्मित सुरदरबार या संकल्पनेतून ही विशेष संगीत मैफिल आयोजित करण्यात आली होती. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकारांनी निर्मित केलेल्या गीतांच्या बरोबरीने केलेल्या गझलेच्या सादरीकरणातून रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय
सुरदरबार मैफिलीने १ नोव्हेंबर २०२२ रोजी संगीत सेवेच्या ३६ व्या वर्षात पदार्पण केले असून याआधीच ६०० संगीत मैफिलींचा टप्पा पार केला असल्याचे प्रसाद साडेकर यांनी यावेळी सांगितले.
पंढरपुरातील मंदिरे पाडण्याच्या निर्णयामुळे, भाजपच्याच जेष्ठ नेत्याने केले नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप
या संगीत मैफिलीतील गायक कलाकारांमध्ये प्रसाद साडेकर, सौ. वर्षा जोशी, अक्षता मुळे, अनिरुद्ध वरणगावकर , डॉ. सुनिता गोपनपल्लीकर यांचा समावेश होता. गायनाला साथसंगत करणाऱ्या कलाकारांमध्ये राजेश देहाडे, जगदीश व्यवहारे, संजय हिवराळे, जितेंद्र साळवी, संकेत देहाडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली साडेकर यांनी केले.
मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम परत करावी लागणार
(प्रतिनिधी – ज्ञानेश्वर ताले)