बॉलिवूडसाठी मोठा धक्का, सलमान खानच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपट निर्मात्याचे दु:खद निधन

बॉलिवूड मधून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते नाझिम हसन रिझवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

नाझिम हे गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होते. त्यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु, अद्यापही त्यांच्या आजाराविषयी माहिती समोर आलेली नाही.

धनुष्यबाण व शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!

चित्रपट निर्माते नाजिम हे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही तिथेच केले जाणार आहेत. मात्र, त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून सिनेजगतासाठी ही अत्यंत दु:खद बातमी आहे.

“Shoot चालू असतानाच अचानक…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने रुग्णालयामधून

दरम्यान, नाझिम हसन रिझवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. 2001 मध्ये आलेला सलमान खानचा चित्रपट ‘चोरी चोरी चुपके चुपके’ने इंडस्ट्रीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात सलमानसोबत राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा दिसल्या होत्या. नाझिम यांचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राखी सावंतच्या नवऱ्याला १४ दिवसांची

याशिवाय नाझिम यांनी 2007 मध्ये आलेला ‘अंडरट्रायल’, 2012 मध्ये रिलीज झालेला ‘कसम से कसम’ आणि 2017 मध्ये आलेला ‘लादेन आले रे ले’ यासह इतर अनेक चित्रपट केले होते. ‘कसम से कसम’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या मुलाला मनोरंजन विश्वातील पाऊल टाकण्याची संधी दिली. अझीम रिझवी असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *