Ajit Pawar | अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सर्वात मोठा बंड करत आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु शपथविधी घेऊनही या मंत्र्यांना कोणतेही खाते दिले नाही. त्यामुळे पवार गटात अस्वस्थता वाढत आहे. अशातच आता या मंत्र्यांनी खाते दिले नसताना कामकाज सुरु केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज 502 क्रमांकाच्या केबिनमध्ये तात्पुरती बसण्याची व्यवस्था केली आहे. (Latest Marathi News)
धक्कादायक! दिल्ली बुडाली, सुप्रीम कोर्टाच्या दारात साचले पाणी
सध्या 602 क्रमांकाची केबिन रिक्त असली तरी ती शापित असल्याने कोणीच घेत नाही. त्यामुळे अजित पवारांनीही ही केबिन घेतली नाही. त्यामुळे त्यांना बाजूच्या दोन केबिन एकत्रित देण्यात येणार आहे. सध्या त्या केबिनचं कामही सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची केबिन असणाऱ्या सहाव्या मजल्यावर केबिन त्यांना न देता पवारांना पाचव्या मजल्यावरची 502 क्रमांकाची केबिन दिली आहे.
नागरिकांनो सावधान! राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाची माहिती
दरम्यान, शपथविधी होऊन आठवडा उलटला तरी अजून खातेवाटप झाले नाही. अजित पवारांना मंत्रालयात (Ministry) पाहून अनेकांना धक्का बसला. अशातच आता अजित पवार कोणत्या खात्याची जबाबदारी घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजप आपल्याकडे असणारी खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देणार आहे. परंतु शिंदे गटाकडे असणारी खाती पवार गटाला मिळणार नाहीत.
दूध उत्पादकांना मोठा फटका! गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
सध्या अजित पवार यांनी आपल्याकडे जास्त आमदार असून त्यांनी पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या (Lok Sabha and Vidhan Sabha Elections) तोंडावर त्यांना हे पक्ष आणि चिन्ह मिळणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.