अखेर पोलीस भरतीचा GR निघालाचं, राज्यात तब्बल 11 हजार 443 पदांच्या भरतीस मंजुरी

Finally GR of police recruitment is released, approval for recruitment of as many as 11 thousand 443 posts in the state

मुंबई : राज्य शासनाने आता पोलीस भरतीची (Police recruitment) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासायक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने (state government) १४ ऑक्टोबर २०२२ रोजी एक GR काढून 100% रिक्त जागा असलेल्या भरण्यास मान्यता दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे या GR नुसार राज्यात पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या सर्व वर्गातील तब्बल 11 हजार 443 पोलिसांची पदांची भरती करण्यात येणार आहे.

India: भारताची स्थिती भूकेच्या बाबतीत पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही गंभीर, वाचा सविस्तर

राज्यातली भरती प्रक्रिया गेली दोन वर्ष कोरोनामुळे (corona) थांबवण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांचे डोळे कित्येक महिन्यांपासून पोलीस भरतीकडे लागले होते. इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकारमध्येही पोलीस भरती घेण्यासंदर्भात मोठ्या घोषणा झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात GR निघालेला नव्हता. दरम्यान आत्ता शिंदे फडणवीस सरकारने GR काढल्याने येत्या 2 -3 महिन्यात भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

मनाला सुन्न करणारी घटना, रुग्णालयाच्या छतावर सापडले 500 मृतदेह; शरीराचे अवयवही झाले गायब

सध्याच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने 100% रिक्त पदे तातडीने भरण्यात यावा असं शासन निर्णयात नमूद केलं आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. पोलीस भरतीमुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठी संधी मिळावी म्हणून गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना याचा अधिक लाभ झाला होता.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन टप्प्यात वितरित होणार चार हजार कोटी रुपये, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

भाजप सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर सरकारने भरती प्रक्रियेत बदल करून आधी लेखी परीक्षा घेण्यात आली. पुढे 2019मध्ये आघाडी सरकार आले या सरकारने 2019 च्या पोलीस भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हेतू ग्रामीण तरूणांना पोलिस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल असा होता. दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी आता आगामी भरती वेळी केली जाणार आहे.

अमूल दूध दरात प्रतीलिटर ‘इतक्या’ रूपयांनी वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना महागाईचा झटका!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *