Thackeray-Shinde: अखेर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना वर्षा बंगल्यावर भेटणार, कारण…

Finally, Raj Thackeray will meet Chief Minister Shinde at Varsha Bungalow, because...

मुंबई : गणेशोत्सवाचे निमित्त करून तसेच बऱ्याच कारणांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वेळोवेळी भेटी होताना दिसत आहे. दरम्यान या भेटीतून मनसे-भाजप युती होण्याची संकेत दिसत आहेत. दरम्यान अशातच शिवसेनेशी बंड पुकारून भाजपशी युती करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांची देखील जवळीक वाढत आहे.

Baramati: पवारांच्या बारामतीवर भाजपच लक्ष, आत्तापासूनच सुरू केलं ‘बारामती मिशन’

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी विषय होता गणेशोस्तव म्हणून निमित्त काढून ते गेले होते.द रम्यान राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंची भेट घेणार आहेत आणि मुख्यमंत्री निवासस्थानच्या म्हणजेच वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेणार आहेत. हे दौरे, या भेटीगाठी यावरून अस दिसून येत आहे की, मुंबई महापालिका निवडुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती होईल. सध्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Shahnaz Gill: मध्यरात्री लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली शहनाज गिल; पाहा VIDEO

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shaha) मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शनही घेतले. दरम्यान अमित शहा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं (bjp) लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल अशी घोषणा भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *