अखेर राखीच्या नवऱ्याने सोडले मौन; म्हणाला “मला सुशांतसिंह राजपूत…”

Finally, Rakhi's husband broke his silence; Said "I love Sushant Singh Rajput..."

मराठी बिगबॉस मधून बाहेर पडताच अभिनेत्री राखी सावंत ( Rakhi Sawant) विविध संकटांना सामोरे जात आहे. अचानक आईचा झालेला मृत्यु आणि तिच्या लग्नावरून सुरू झालेल्या अडचणी यामुळे राखी सावंत सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेक ठिकाणी राखी रडताना दिसत आहे.

शरद पवारांनी ‘ते’ विधान करताच सभागृहात पिकला हशा! थेट इंदुरीकर महाराजांनाच केले टार्गेट

मध्यंतरी रखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतचे (Aadil Khan) लग्नाचे फोटो दाखवले होते. मागील काही दिवसांपासून ती आदिल खान दुर्रानीवर आरोप करताना पहायला मिळत आहे. इतकंच नाही तर कालपर्यंत नवऱ्यावर आरोप करणारी राखी आता त्याला चांगला माणूस देखील म्हणू लागली आहे.

संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ होताच सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझ्या संपत्तीची…”

दरम्यान राखीचा नवरा आदिल खान दुर्रानी याने इन्स्टाग्रामवर खळबळजनक पोस्ट लिहिली आहे. आतापर्यंत राखी आदिलचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू असल्याचे आरोप करत होती. तसेच तो घटस्फोट देण्याची धमकी देतोय असेही तिने रडत रडत सांगितले होते. या अरोपांवर आदिलने आता मौन सोडले आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; उमेदवारांचे चित्र होणार स्पष्ट

‘मी एखाद्याच्या मागून बोलत नाही, याचा अर्थ मी चुकीचा आहे असा नाही. मी माझ्या धर्माचा आदर आणि महिलांचा आदर करतो. माझ्यावर कोणती परिस्थिती आली आहे आणि राखी माझ्यासोबत काय करतेय. हे सांगितले तर ती बोलण्याच्या लायकीची राहणार नाही. म्हणून ती रोज तुमच्यासमोर येऊन सांगते की, आदिल वाईट आहे.’ असं त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.

मोठी बातमी! सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ

‘ज्या पद्धतीने राखीने म्हटले की, ती फ्रीजमध्ये राहणार नाही, त्यावर मीसुद्धा बोलू शकतो की मला सुशांत सिंह राजपूत नाही व्हायचंय. कोण काय आहे हे योग्य वेळीच समोर येईल. माझ्यासारखा समजुतदार व्यक्ती, राखीसोबत नेहमीच उभा राहिला. तिला हवे ते सर्वकाही दिले होतं. राखी तू तुझ्या प्लॅनला खूप चांगल्या प्रकारे पूर्णत्वास नेलंस, पण तुझी पद्धत स्मार्ट नव्हती’, या शब्दांमध्ये आदिलने राखीला सुनावले आहे.

उर्फी जावेदच्या कपडद्याबद्दल अभिनेत्री अलका कुबल यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *