
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर सक्तवसुली संचालनालयलाने रविवारी सकाळी सातच्या सुमारास येऊन कारवाई केली. व त्यांच्या राहत्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर तिथून त्यांना इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. सकाळी सातच्या सुमारास राऊतांच्या भाडूप बंगल्यावर इडी चे अधिकारी दाखल झाले. दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल सीआयपीएफ जवानही तैनात करण्यात आले होते.
यापूर्वी संजय राऊत यांना इडी ने तीनवेळा त्यांना समन्स बजावले होते. 27 जुलै ला मात्र, २७ जुलैला ईडी ने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले असताना राऊत चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर रविवारी सकाळीच सातच्या सुमारास इडीच पथक राउत त्यांच्या घरी पोहोचल. त्यांच्या घरातील कागदपत्र व दस्तावेज अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले व साडेअकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली.
या प्रकरणाबाबत जबाब नोंदवण्यासाठी मला ईडी कार्यालयात यावा लागेल असे संजय राऊत यांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजता ईडी अधिकारी संजय राऊत यांना घेऊन बेलाड पियर येथील कार्यालयाकडे गेले. त्यांना नेत असताना त्यांनी गाडीतून शिवसैनिकांना अभिवादन केले. राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे ईडीच्या कार्यालय समोर उभे होते. राऊत यांची चौकशी साडेचार तासाहून अधिक चालली.त्यांच्या घरी सापडलेल्या साडेअकरा लाखांचा हिशोब न देता येणे आणि चौकशीला सहकार्य न करणे या दोन आरोपांखाली त्यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी पावणे एक वाजता संजय राऊतांना अधिकृतपणे ED कडून अटक करण्यात आली. उद्या मेडिकल तपासणी होऊन संजय राऊतांना कोर्टात हजर करण्यात येईल.
नेमकं काय आहे पत्राचाळ गैरव्यवहार?
मुंबईमधील गोरेगाव येथे पत्राचाळी मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची जमीन आहे. या चाळीचा पुनर्निर्मान करण्यासाठी प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन यांना दिला होता परंतु त्यांनी त्या जागेतील काही भाग इतर खाजगी बिल्डरांना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.