Site icon e लोकहित | Marathi News

Shivamurthi Murgha Sharanaru: अखेर शिवामूर्तींना लैंगिक शोषण प्रकरणात अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Finally Shivamurthy arrested in sexual abuse case, 14 days judicial custody

दिल्ली : कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्यावर अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री उशीरा कर्नाटक पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता अटक केली. रात्री अटक करण्यात आल्यानंतर त्यांना चित्रकुट जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर १४ न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती दिली.आज न्यायालयीन कामकाज सुरु झाल्यानंतर पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे. दरम्यान, हे सर्व आपल्या विरोधात रचलेलं कटकारस्थान आहे.तसेच याप्रकरणात लवकरच निर्दोषत्व सिद्ध करु, असे शिवामूर्ती यांनी म्हटलं आहे.

Subodh Bhave: पुणे मेट्रो संदर्भात केलेली सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नेमक प्रकरण काय आहे

शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्यावर मठाच्या माध्यमातून चालवत असलेल्या शाळेतील दोन मुलींवर १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ यादरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला.या पीडित मुलींनी मठातून पळ काढत कोट्टनपेट पोलीस ठाणे गाठले.दरम्यान मुरघा शरानारू यांच्याविरोधात दोन अल्पवयीन मुलींनी मैसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शिवामूर्तींविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या शिवामूर्तींविरुद्ध लुकआऊट नोटीस जाहीर केली होती.दरम्यान काल गुरुवारी अखेर पोलिसांनी शिवामूर्तींना अटक केली आहे.

Akal Takht: यापुढे असे धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही; पंजाबमधील अकाल तख्तचा इशारा

Spread the love
Exit mobile version