Breaking : अखेर शिंदे सरकारच खातेवाटप जाहीर! कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा सविस्तर

Finally, the Shinde government announced the distribution of accounts! Which account with which minister? Read in detail

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरून राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्या आहेत. मंत्रिमंडळ उशिरा झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा चालू होती. त्यानंतर खातेवाटप लांबल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. याच पार्शवभूमीवर राज्य सरकारने खातेवाटप जाहीर केली आहे. शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत.

खातेवाटपानुसार मुख्यमंत्र्यांकडे १३ तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खाती देण्यात आली आहेत. यामध्ये एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ त्याचबरोबर इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर असलेलं खातेवाटप आता झालं असून यावरून राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *