
मागील अनेक दिवसांपासून सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेला अर्थसंकल्प आज जाहीर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प ( Budget 2023) जाहिर केला असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सात उद्दिष्टांना प्राधान्य देऊन सप्तर्षी सादर करण्यात आली आहे. तसेच कर संरचनेत देखील महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
हिरेही झाले स्वस्त पण सोने चांदी महागले! यंदाचा अर्थसंकल्प वाचा एका क्लिकवर
याशिवाय पॅनकार्ड ( New Announcement about Pancard) बाबत देखील महत्त्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सीतारामन यांच्या सांगण्यानुसार पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना ही घोषणा केली आहे. इथून पुढे संपूर्ण देशात पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाने पॅनकार्ड ला नवीन ओळख दिली असे म्हंटले जात आहे. आता ओळखपत्र म्हणून तुम्ही पॅनकार्डचा वापर करू शकता.
अबब! तब्बल 12 कोटींचा रेडा; जगातील सर्वात मोठ्या रेड्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
अशी असेल नवीन कर संरचना (Tax Slab)
नवीन आर्थिक वर्षात नवीन कर संरचना राबवली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. यामध्ये 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सवलत मिळणार आहे.
3 लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
1) 3 ते 6 लाख – 5 टक्के
2) 6 ते 9 लाख – 10 टक्के
3) 9 ते 12 लाख – 15 टक्के
4) 12 ते 15 लाख – 20 टक्के
5) 15 लाखांहून जास्त – 30 टक्के