
यंदाचा अर्थसंकल्प जाहीर होऊन महिनाही उलटला नाही इतक्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmla Seetaraman) यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा GST टॅक्स बाबत असून राज्यांना 5 वर्षांच्या थकित जीएसटीची रक्कम दिली जाणार आहे. यातून एकूण 16 हजार 982 कोटी रुपये राज्यांना दिले जाणार आहेत. निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 18) जीएसटी काऊन्सिलची (GST Counsil) 49 वी बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
“…म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज”, काय म्हणाले उदयनराजे भोसले?
दरम्यान जून 2022 मध्ये जीएसटीच्या थकित रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम जारी करण्यात आली होती, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. आता 16,982 कोटी रुपयांची उर्वरीत 50 टक्के रक्कम दिली जाणार आहे. एवढी मोठी रक्कम सध्या जीएसटीच्या खात्यामध्ये उपलब्ध नाही. मात्र तरी आम्ही आमच्या इतर स्त्रोतांच्या माध्यमातून है पैसे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निर्मला सीतारमण यावेळी म्हणाल्या आहेत. भविष्यात भरपाई उपकराच्या माध्यमातून इतकेच पैसे वसूल केले जातील असंही त्यांनी सांगितले आहे.
युवा शेतकऱ्याची कौतुकास्पद कामगिरी! गव्हाच्या पिकातून साकारली ‘शिवप्रतिमा’
या बैठकीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पान मसाल्यावर आकारल्या जाणाऱ्या कॉम्पेसिट बेस्ड टॅक्सेशनसंदर्भातील जीओएमचा रिपोर्ट स्वीकारला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अर्थमंत्र्यांनी गूळ, पेन्सिल शार्पनर आणि काही ट्रॅकिंग उपकरणांवरील जीएसटी कमी केला आहे. तसेच पान मसाला आणि गुटखा उद्योगांकडून केल्या जाणाऱ्या करचोरीची चौकशी आणि जीएसटी न्यायप्राधिकरणावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
४४० व्होल्टचा करंट देण्याच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..