
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड करून भाजप (BJP) सोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप आला होता. अशातच २ जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले, त्यामुळे राज्यात दुसरा भूकंप आला आहे. अजित पवार आणि त्यांच्यासह इतर ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) खूप मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)
बंडामुळे पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्याने राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघाले आहे. बंडानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच बंडानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर येणार आहे.
उत्तर भारतात पावसाने घातले थैमान! जनजीवन विस्कळीत, 37 जणांचा मृत्यू
१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३वी पुण्यतिथी असून या निमित्ताने पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदाचे पुरस्काराचे ४१वे वर्ष असून दीपक टिळक यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित केलं आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? ‘हे’ तीन बडे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत
दरम्यान, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बंडानंतर प्रथमच स्टेजवर शरद पवार आणि अजित पवार एकमेकांना समोरासमोर भेटणार आहेत. या कार्यक्रमात ते एकमेकांना काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.