![Crime News](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/03/C-1024x576.jpg)
Crime News । लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे अनेकांना खूप मोठा धक्का बसला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भाजपाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
Bjp । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्रीआणि भाजपचे वरिष्ठ नेते बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप (Crime) असून याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी कलमांर्तग गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी येडियुरप्पा यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
![Ads](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/03/image-1.png)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रकरणी पीडित मुलगी आणि तिची आई येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. याबाबत येडियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून निवेदन जारी केलं आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने ५३ प्रकरणांची यादी जारी केली असून ज्यात संबंधित महिलेने विविध प्रकरणी अशाच प्रकारे तक्रार दाखल केली आहे.