Fire Accident । अनेकांमध्ये नवीन वर्षाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक नवीन संकल्प देखील करतात. त्याचबरोबर काहीजण बाहेरजातात तर काही लोक नवीन वर्षाचं सेलिब्रेशन हे घरीच करतात. मात्र बऱ्याचदा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा भयानक घटना घडतात त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सध्या देखील एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Bihar Begusarai Fire Accident)
YouTube वर जाहिराती लावण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या…
बिहारच्या बेगुसरायमध्ये सोमवारी (१ जानेवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. या ठिकाणी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करून पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह घरात निवांत झोपले. मात्र, रात्रीच्या वेळी घराला अचानक आग लागली. आणि आगीने मोठे रूप धारण केले. ही आग एवढी भीषण होती की या आगीमध्ये कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
Viral Video । मोठी बातमी! मद्यधुंद तरुणीचा हॉटेलमध्ये राडा
एका क्षणात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. नीरज पासवान, कविता देवी, लव (वय ५) आणि कुश (वय ३) अशी मृत्यू झालेल्या नावे आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप समजलेली नाही. मात्र पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. (Bihar News)
Viral News | ‘साहेब थंडीचा त्रास होतोय, मला बायको पाहिजे…’; तरूणाने पोलिसात केली अजब तक्रार
ही आग लागल्याची माहिती समजताच गावकऱ्यांनी आग वीजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढी भीषण होती की, गावकऱ्यांना आग विझविण्यात अपयश आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्यास सुरवात केली. आग आटोक्यात आल्यानंतर चारही सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.