Fire in railway station । धक्कादायक! रेल्वे स्थानकात भीषण आग, एकजण गंभीर जखमी

Fire in railway station

Fire in railway station । मुंबई : सतत आग (Fire) लागल्याच्या घटना समोर येतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील (Mumbai Lokmanya Tilak Terminus Station) आरक्षण केंद्र आणि विश्रामगृहात भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. (Latest Marathi News)

Maratha Reservation । मराठा आरक्षणासाठी घेतला टोकाचा निर्णय, छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर संपवलं जीवन

आग लागताच स्थानकातील प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. प्रवाशांना बाहेर काढेपर्यंत स्टेशनच्या प्रतीक्षागृहापर्यंत आग पसरल्याची माहिती प्रवाशांनी दिली. अग्निशमन दलाला ५ वाजून २४ मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. खबरदारी म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने एलटीटी स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडीत केला होता. (Fire Broke Out In Lokmanya Tilak Terminus Station)

Supriya Sule । सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद महारत्न’ जाहीर

दरम्यान, विद्युत पुरवठा खंडीत केल्याने रेल्वेगाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. प्रतीक्षागृह आणि अनाउन्समेंट सेंटर मोकळे केले होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नियंत्रणात आणल्याने पुन्हा रेल्वेसेवा सुरळीत करण्यात आली. परंतु, या दुर्घटनेत फारुख सिद्दीकी (वय,४५ वर्ष) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

VIDEO । तरुणीसह डान्स करणं होमगार्डच्या आलं अंगलट, घडलं असं काही की..

Spread the love