मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अनेक ठिकाणी जाहीर निषेध होत आहे. काही ठिकाणी तर लोकांनी त्यांच्या फोटोला चप्पलचा हार देखील घातला. त्यामुळे सर्वच स्तरातून राज्यपाल हटावच्या मागणीने जोर धरलेला आहे.
दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत केलं लग्न
यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. तर उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) आझाद मैदानावर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली आहे. आता यामध्येच पिंपरी चिंचवडमधील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. येत्या 8 तारखेला हा बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
“संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळ केलं…”, शिंदे गटाचा हल्लाबोल
दरम्यान, कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झाला आहे. यामुळे मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) सात दिवस राज्यात आंदोलन करणार आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सर्व मंत्र्याच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मोफत रेशनबाबतचा नवीन नियम देशभर लागू! सरकारने सुरू केली ‘ही’ सुविधा