मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे वनिता खरात (Vanita Kharat) आता घराघरात लोकप्रिय झाली आहे. दरम्यान तिची विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंग यामुळे प्रेक्षकांची तिला भरभरून दाद मिळत आहे. विशेष म्हणजे तिने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये देखील काम करत एक उत्तम अभिनेत्री (actress) म्हणून स्वतःला सिद्ध केलं. इतकंच नाही तर आता वनिता जाहिरातही करते. दरम्यान नुकतीच तिने केलेली एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये (advertising) वनिताने केलेलं काम लक्षवेधी ठरत आहे.
काय सांगता! एका मराठमोळ्या चाहत्याने चक्क 57 भाषांमध्ये कारवर छापलं रतन टाटांंच नाव
महत्वाची बाब म्हणजे गौरव मोरे पाठोपाठ आता वनितालाही जाहिरातींच्या कामासाठी बोलवलं जात आहे. वनिताने नुकतंच एका कोल्ड ड्रिंग ब्रँडसाठी (cold drink brands) जाहिरात केली. तिच्या या जाहिरातीमधील हटके अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनाही खरतर हसू अनावर झालं आहे. या जाहिरातीमध्ये लग्नाची पहिली रात्र आणि या सुंदर क्षणांसाठी नवरदेव करत असलेली तयारी दिसत आहे. त्यानंतर वनिता नटून-थटून रूममध्ये येते.
आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘या’ बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे पुल कोसळला; पाहा VIDEO
आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मग काय ती प्रेमामध्ये नवऱ्याला कोल्ड ड्रिंकची बॉटल पुढे करते. पुढे नवरा हे कोल्ड ड्रिंक पितो आणि बेडवर पडतो. दरम्यान जाहिरातीची हि भन्नाट कल्पना आणि महत्वाचं म्हणजे वनिताचा अभिनय या दोन्ही गोष्टींचं नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. यावेळी तिच्या चाहत्यांनी ” तुमच्या क्रिएटीव्हीटीला सलाम, वनिता खरात अगदी उत्तम, मस्त जाहिरात” अशा कमेंट केल्या आहेत.
शेतात पिकांवर फवारणी करताना सावधान! 55 वर्षीय शेतकरी महिलेचा औषध फवारणी करताना झाला मृत्यू