Bacchu Kadu । आधी वादग्रस्त वक्तव्य आणि नंतर बच्चू कडूंचा माफीनामा, म्हणाले; “माझा शब्द..”

First the controversial statement and then an apology from Bachu Kadu, said; "My word.."

Bacchu Kadu । काल प्रहार जनशक्ती (Prahar Jan Shakti) पक्षाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आमदार बच्चू कडू यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ‘हिजडे सुद्धा आमदार होतात’, असे वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी चांगलाच निशाणा साधला आहे. आपली चूक लक्षात येताच बच्चू कडूंनी माफी मागितली आहे. (Latest Marathi News)

Bus Accident । देवदूतासारखे धावून आले उदय सामंत! ताफा थांबवून केली जखमी प्रवाशांना स्वतःच्या कारमधून नेले दवाखान्यात

“ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो त्यावेळी ती बाई आहे की माणूस हे समजत नाही. हिजडे सुद्धा आमदार होतात,” असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. त्यानंतर त्यांनी चुकीची कबुली देत आपल्याला आंडू-पांडू लोकही आमदार होतात, असे म्हणायचे होते असे स्पष्ट करत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Mohan Bhagwat । मोहन भागवतांची डाव्यांवर सडकून टीका, म्हणाले; “मुलांच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबत..”

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या रॅलीत शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावरून बच्चू कडू यांनी काँग्रेसवर (Congres) ताशेरे ओढले आहेत. “कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होऊ नये. असे जर एखादी संस्था करत असेल तर या संस्था बंद कराव्यात. संबंधितांवर कारवाई करावी,” अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली आहे.

Credit Card । क्रेडिट कार्डचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? कमवता येणार अतिरिक्त पैसे

Spread the love