Monsoon Update | सध्या हवामानात झपाट्याने बदल होतोय. कधी पाऊस पडतोय तर कधी कडाक्याचं ऊन पडतंय. दरम्यान, हवामानासंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मान्सूनवर होऊ शकतो. केरळमध्ये अजूनही मॉन्सूनला अनुकूल असे घटक तयार झाले नाहीत. या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह कोकणच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात खोलवर जाऊन मच्छीमारी करू नये. असं आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आलं आहे.
Odisha Train Accident । रेल्वे अपघातात प्राथमिक चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
हे वादळ गोवा व मुंबईचा पश्चिम नैऋत्य भाग पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्राच्या पूर्वेला आणि मध्य भागात पुढील 24 तासांमध्ये हे वादळ प्रचंड तीव्र होण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये मान्सून पूर्वीच चक्रीवादळ आले होते. तर 2023 मध्ये उत्तर हिंदी महासागरामध्ये मागच्या तीन आठवड्यांमध्ये निर्माण झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. याआधीही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा या चक्रीवादळाने खूप नुकसान केले होते.
मोठी बातमी! रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 8, 9, 10 जून पर्यंत वाऱ्यांचा वेग 40 ते 50 KMPH एवढा असणार आहे. हा वेग 60 KMPH पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीलगत समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये मच्छीमारांनी जाऊ नये अशी हवामान विभागाने सूचना केली आहे.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 10 जूनपर्यंत इंटरनेट बंदी