
बारामती येथे भिगवण (Bhigwan) रस्त्यावर एका पत्रकारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. गोळीबार झालेल्या पत्रकाराचे नाव आकाश जाधव असे होते. बारामतीत पत्रकारावर गोळीबार केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन
दरम्यान, पत्रकार (journalist) या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्या मणक्याला गोळी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर
हल्ला झालेले पत्रकार एका स्थानिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. बारामती येथील भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती.