Flipkart Smartphone Offers । तुम्हाला स्वस्त 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर फ्लिपकार्टवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. ऑनलाइन मार्केटप्लेसवर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. जर तुमचा विचार Vivo चा 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्ट अनेक हजार रुपयांची सूट देत आहे. Vivo T2x 5G फोन खरेदी करून तुम्हाला हजारो रुपये वाचवण्याची संधी मिळेल. या फोनची मूळ किंमत 18,999 रुपये आहे, परंतु तुम्ही हा फक्त 12,999 रुपयांना खरेदी करू शकता.
फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल 5 जानेवारीपासून सुरू झाला. ऑनलाइन सेल ७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. जर तुम्हाला Vivo फोन स्वस्त किंमतीत घ्यायचा असेल तर खूप कमी वेळ शिल्लक आहे. फ्लिपकार्ट तुम्हाला आणखी बचत करण्याची संधी देत आहे. सवलतींव्यतिरिक्त, तुम्ही निवडक बँकांचे कार्ड वापरून वेगळ्या सवलतींचा लाभ घेऊ शकता.
Sharad Mohol Video । शरद मोहळच्या हत्येचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर
Vivo T2x 5G:डिस्काउंट ऑफर
Vivo T2x 5G चा 6GB + 128GB स्टोरेज प्रकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या 5G स्मार्टफोनची मूळ किंमत 18,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट या फोनवर 6,000 रुपयांची सूट देत आहे. डिस्काउंट ऑफरसह, तुम्ही हा फोन फक्त 12,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनी या हँडसेटच्या खरेदीवर 31 टक्के सूट देत आहे.
Vivo T2x 5G: वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 6020 चिपसेटचा सपोर्ट आहे. 6GB रॅम आणि 128GB व्यतिरिक्त, यात 5000mAh बॅटरी पॉवर असेल. कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.
Sharad Mohol | ब्रेकिंग! शरद मोहोळच्या हत्येमागील खरा मास्टर माईंड समोर; पोलिसांनी दिली माहिती