Flood Situation : अजित पवारांनी बोलावली राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक; पुरस्थितीचा घेणार आढावा

Flood Situation: Ajit Pawar called a meeting of all District Collectors in the state; Will review the situation

Flood Situation : अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभा राहिले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साठले आहे. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान येथील शेतकऱ्यांनी मदत मिळावी अशी मागणी सरकारकडे केली होती. यानंतर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. आता याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

Mumbai News : बाळ नाल्यात पडलं त्यावेळी नेमकं काय घडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा क्षण

माहितीनुसार, ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार असून या बैठकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) विविध जिल्ह्यातील पावसाचे आणि पूरस्थितीची माहिती जाणून घेणार आहेत. (Flood Situation)

Viral Video । धबधब्यातील दगडावर उभा राहून तरुण रील बनावत होता; तेवढ्यात पाय घसरला अन् घडलं भयानक; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

अजित पवारांनी पुरग्रस्थांसाठी काल केल्या तीन मोठ्या घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेमध्येकाल पूरस्थितीवर त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी धडाकेबाज घोषणा केल्या आहेत. यामधील पहिली घोषणा म्हणजे, पूरग्रस्तांना तातडीचे दहा हजार रुपयांची मदत मिळणार त्याचबरोबर दुसरी घोषणा म्हणजे दुकानाचे नुकसान झाल्यास पन्नास हजारांची मदत केली जाणार आणि तिसरी व शेवटची घोषणा म्हणजे, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत दिली जाणार या गोष्टीमुळे पूरग्रस्त नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Mumbai landslide । लोक झोपेत असतानाच इमारतीवर कोसळली दरड, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Spread the love