flooded । मागच्या जुलैमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. नदी नाले दुथडी भरून वाहत होते. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणच्या गावांमध्ये तर पुराचे पाणी शिरले होते. यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आता ढगफुटीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच बेघर झालेल्या लोकांना आर्थिक मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.
Milk Price । दूध दरावरून किसान सभा आक्रमक, 35 रुपयांचा दर देण्याची मागणी
त्याचबरोबर सरकारने फक्त घोषणा करू नये तर पूरग्रस्त भागातील लोकांना मदत देखील करावी असे पूरग्रस्त भागातील युवकांचे म्हणणे आहे. जर मागणी मान्य केली नाही तर आंदोलनाचा इशारा देखील या युवकांनी दिला आहे. दरम्यान जुलै महिन्यामध्ये इतर जिल्ह्यांसह बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होतं. त्यांना मदत मिळावी म्हणून युवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली आहे.
पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सांगितली व्यथा
जुलै महिन्यामध्ये जळगाव, जामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तसेच ढगफुटी होऊन सदृष्य स्थिती निर्माण झाली होती यामुळे लोकांच्या घरात पाणी तसेच शेतात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे अनेक लोकांना घरे देखील राहिली नसल्याची खंत युवक सांगत आहेत. काही लोकांची जनावरे तर काहींची दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने खूपच आर्थिक नुकसान झाल्याची माहिती या युवकांनी दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पेरणी केलेले पीक वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तर शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. एवढी भीषण स्थिती असून देखील सरकारने आतापर्यंत या नुकसानग्रस्त भागातील लोकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली नसल्याची या ठिकाणच्या युवकांचे म्हणणे आहे.
Virat Kohli । इंस्टाग्राम कमाईवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी इतके पैसे…”
गरिबांनी जगावं की मरावं?
सध्या काही भागातील शेतकऱ्यांनी तसेच गरीब लोकांनी जगाव की मराव हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना अजूनही मदत जाहीर झाली नाही. वीस दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा आर्थिक मदत मिळत नसेल तर आम्ही लोकांनी कोणाकडे पाहायचं? असा प्रश्न या युवकांनी उपस्थित केला आहे. या परिसरातील काही युवकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे या मागण्यांचे पत्र दिले आहे. त्याचबरोबर आमच्या मागण्या जर सरकारने लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर आम्ही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Sanjay Raut । नवाब मलिकांना जामीन कसा मिळाला? राऊत म्हणाले, नवीन इंजेक्शन घेतले …