Floods in Assam and Manipur । भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसानंतर मणिपूर आणि आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोकांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. आसाम आणि मणिपूर या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने या आठवड्यात सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. लष्कर, आसाम रायफल्स, राज्य पोलीस, मणिपूर अग्निशमन सेवा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान आणि स्थानिक स्वयंसेवक पूरग्रस्तांना वाचवण्यात गुंतले आहेत.
Politics News । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांची ‘गुप्त’ बैठक
अधिकाऱ्यांनी बुधवारी (3 जुलै, 2024) सांगितले की, दोन्ही राज्यांमध्ये पुरामुळे एकूण 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आसाममध्ये ४६ आणि मणिपूरमध्ये दोन मृत्यू झाले आहेत. आसाममध्ये बुधवारी पुराच्या पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला, तर मणिपूरमध्ये 29 जिल्ह्यांतील 16.25 लाखांहून अधिक लोक पुराच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधित झाले आहेत.
मणिपूरमध्ये 2800 गावे पाण्यात बुडाली
त्याच वेळी, मणिपूरमधील पूरग्रस्त भागातून 2000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 105 महसुली मंडळांतर्गत 2800 गावे अजूनही पाण्यात बुडाली असून पुराच्या पाण्यात 39451.51 हेक्टर पीक क्षेत्र बुडाले आहे. आसाममध्ये, 24 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने स्थापन केलेल्या 515 मदत शिबिरांमध्ये आणि वितरण केंद्रांमध्ये 3.86 लाखांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे.