मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद ( Urfi Javed) व चित्रा वाघ ( Chitra wagh) यांच्यातील वाद अगदी शिगेला पोहोचले आहेत. उर्फीच्या अजब फॅशन सेन्स वरून चित्रा वाघ यांनी तिला टोकले आहे. तसेच ‘सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?’ अशी टीका चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर केली आहे. यानंतर या दोघींच्यात ट्विटरवर चांगलेच युद्ध पेटले आहे. मात्र अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फीच्या कुटुंबाबद्दल तिच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत.
मोठी बातमी! विमान कोसळून ३० जणांचा मृत्यू
उर्फी जावेद ही बिगबॉस ओटीटी ( Bigboss OTT) मुळे लोकांच्या दृष्टिक्षेपात आली होती. ती मुळची उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील आहे. उर्फीवर तिच्या दोन बहिणी व आईची जबाबदारी आहे. आईवडीलांच्या घरगुती वादाला कंटाळून उर्फीने काही वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती.
धक्कदायक! नायलॉन मांजामुळे दहा वर्षीय चिमुरडी गळा कापल्याने गंभीर जखमी
तिचे वडील कायम शिवीगाळ व मारहाण करायचे. याला कंटाळून उर्फीने घर सोडले व मुंबईला आली. नंतरच्या काळात तिच्या वडिलांनी देखील दुसरे लग्न केले. त्यामुळे तिच्या बहिणी व आई देखील उर्फी सोबत राहू लागल्या. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी उर्फी सुरुवातीला छोट्या- मोठया भूमिका करत होती. नंतर बिगबॉस ओटीटी मुळे ती प्रकाशात आली व सर्वत्र तिच्या फॅशनची चर्चा झाली.
‘महिलांनो दोनच अपत्यावर थांबा, उगाच पलटण वाढवू नका’; अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत
यानंतर मात्र तिची फॅशन हीच तिची ओळख बनली. मीडिया रिपोर्टनुसार सध्या वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी उर्फीची संपत्ती दीडशे कोटींपेक्षा जास्त आहे. इतकच नाही तर उर्फी दर महिन्याला 2 ते 5 मिलियन कमाई करते. सध्या तिच्याकडे सर्व सोयीसुविधा असून मुंबई मधल्या एका आलिशान फ्लॅट मध्ये ती राहते.
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे पुन्हा गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण