मुंबई : आज गणेश चतुर्थी , आजच्या दिवशी महाराष्ट्र सगळीकडे गणरायाचं वाजतगाजत आगमन होत. दहा दिवस गणपती आपल्याकडे मुक्कामी असतात. गणपती बाप्पाच्या आगमना बरोबर सुरू होतात गणपतीला भक्तांच्या मागण्या! या उत्सवात प्रत्येक जण गणपतीला काही ना काही मागत असतो. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापूं यांनी गणपतीला चक्क ठाकरे कुटुंबीयांच्या समृद्धीसाठी साकडे घातले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शहाजी बापू पाटील यांनी अचानक केलेल्या या प्रार्थनेचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.
बघुयात शहाजी बापूंनी गणपतीला काय मागितल?
सांगोला येथील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या राहत्या वाड्यामध्ये आज गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. मोठ्या आनंदामध्ये पाटील कुटुंबांनी गणरायाचे स्वागत केले आहे. शहाजीबापू पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती रेखाताई पाटील यांनी आज सकाळीच बाप्पाची विधीवत पूजा करून दर्शन घेतलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना शहाजी बापू पाटील यांनी मातोश्रीवर समृद्धी नांदावी यासाठी गणरायाला साकडे घातल्याचं स्पष्ट केलं आहे. “मातोश्रीच्या दारात सुख शांती दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना शहाजी बापू पाटील यांनी गणरायांकडे केली आहे.
पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते? कोणत्या गणपतीचा काय आहे विशेष? जाणून घ्या माहिती!
गणपती बुद्धीची देवता आहे. पण सध्या राजकारणात गणपतीला कोणाला सुबुद्धी द्यावी हे सर्व राज्याला माहिती आहे. वाद टाळून एक व्हावे, संघटना वाढवावी हीच आपली इच्छा आहे. संघर्षातून कधीच प्रगती होत नाही. शांततेतून प्रगतीचा मार्ग ठरला जातो आणि हाच शांततेचा मार्ग एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आहे, असं त्यांनी सांगितलं.” त्याच बरोबर यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर टीका देखील केली. ते अशे म्हणाले की, अमोल मिटकरी राजकारणात विचार करण्यासारखे पात्र नाही. मी जॉनी लिव्हर तर तुम्ही सोंगाड्या आहात, अशी टीका त्यांनी मिटकरी यांच्यावर केली. संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे मिटकरीला वाटतंय, आपण त्यांची जागा घेऊ. म्हणून तेल लावून टिव्हीपुढे येतंय, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, शहाजी बापूंना मंत्रीपद मिळावं, अशी प्रार्थना त्यांची पत्नी रेखाताई यांनी गणरायाकडे केलीय.
जनतेसाठी काय मागितलं?
आवर्षणग्रस्त भागात पाणी मिळवण्यासाठी यंदा पाऊस पडू दे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे. पीकपाणी जोरात होऊ दे. राज्यात सुख शांती नांदू दे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याच्या सुखाची कामे होऊ दे हीच गणरायाकडे प्रार्थना आहे, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.