मागच्या पाच सहा दिवसापूर्वी राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी गारा देखील पडल्या आहेत. राज्यातील तापमानात (Tempreture) सातत्यानं चढ उतार होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गौतमी पाटील’ ची चर्चा; ‘या’ नेत्याने केले गंभीर वक्तव्य
सातारा (Satara) जिल्ह्यासह पुणे (Pune), धुळे, वर्धा या जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या पावसाने बळीराजाची चिंता वाढली आहे.
चपलीच्या वजनावरून समोर आली एवढी मोठी तस्करी; चोराची शक्कल वाचून तुम्हीही व्हाल थक्क
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या कालावधीमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि आता पाऊसामुळे पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी राजा आता दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी असं आव्हान कृषी विभागानं केलं आहे.