मुंबई : ‘टीम इंडिया’चा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan)त्याच्या कुटुंबासोबत मुंबईहून दुबईला निघाला होता. दरम्यान यावेळी इरफान पठाण सोबत एक विचित्र प्रकार घडला आहे.इरफानने विस्टाराच्या चेक-इन काऊंटरवर सुमारे दीड तास उभे ठेवण्यात आल्याचा प्रकार घडल्याचा आरोप (Accusation)केला आहे.
Sweet potatoes: रताळ्याच्या सेवनाने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या सविस्तर
इरफानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.इरफानने सांगितले की, हा प्रकार घडला त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी आणि दोन मुले होती.इरफान पठाणचा आशिया कप २०२२ च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.२७ ऑगस्टपासून यूएईमध्ये ही स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी इरफान दुबईला रवाना होत होता, त्यावेळी हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
Hope you notice and rectify @airvistara pic.twitter.com/IaR0nb74Cb
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 24, 2022
ट्विटरवर पोस्ट शेअर करताना इरफान पठाणने लिहिले की, ‘आज (बुधवार) मी मुंबईहून (Mumbai)दुबई विस्टारा फ्लाइट UK-201 ला निघालो होतो. दरम्यान, चेक-इन काऊंटरवर मला वाईट वागणूक देण्यात आली. विस्ताराने माझ्या कन्फर्म तिकिटात फेरफार केला. ही समस्या सोडवण्यासाठी मला दीड तास काऊंटरवर ताटकळत उभे राहावे लागले. माझ्यासोबत माझी पत्नी आणि दोन मुले (एक ५ वर्षांचे, एक ८ महिन्यांचे) होती.
Mumbai: आज मुंबईत पार पडणार मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक