मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथा-पालथी घडत आहेत. राजकारणात टीका-टिप्पणी सुरूच आहे. अशातच भाजपाचे माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) हे शिवसेनेत येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा शिवसेना (Shiv Sena) नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चां सुरू आहे. देशमुख यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे तसेच यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ते शुक्रवारी देखील शिवसेना भवनला आले होते, अशी विनायक राऊत यांनी माहिती दिली आहे.
पुणे-सोलापूर मार्गावर श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात! एक जण जागीच ठार
एकीकडे शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. अशातच दुसरीकडे आता विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याकडून संजय देशमुख हे शिवसेनेत येणार असल्याचा दावा केला जात आहे. ही बातमी निश्चितच शिवसेनेसाठी दिलासा देणारी ठरू शकते.
धक्कादायक! बसचा अपघात होऊन एका मुलासह 11 जणांचा होरपळून मृत्यू
गेल्या काही दिवसांत शिवसेनेसाठी दिलासादायक घटना घडताना दिसत आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यानंतर आता संजय देशमुख हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा विनायक राऊतांनी दावा केला आहे. संजय देशमुख यांचा शिवसेना पक्षात प्रवेश झाला तर ही बातमी शिवसेनेसह कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक ठरू शकते.
Devendra Fadanvis: राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार – देवेंद्र फडणवीस