दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण (Ravi Narayan) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मंगळवारी अटक केलीये. याआधी देखील ईडीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.
Raj Thackeray: राज ठाकरे सहा दिवस नागपूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांनी सुरू केली जोरदार तयारी
कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकारांवर तपास चालू होता. आता यामध्ये रवी नारायण यांचा सहभाग आहे का? याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत होते. यानंतर आज ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केल्याची माहितीसमोर आली आहे. अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
यायाधी देखील सक्तवसुली संचालनालयनाने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आणखी एक माजी प्रमुख आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.त्यामुळे या प्रकरणांचा तपास करणाऱ्या सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांना ‘को-लोकेशन’ घोटळ्यात अटक केली होती.