आपल्या आजूबाजूला सतत विनयभंगाच्या व बलात्काराच्या घटना घडत असतात. अशा घटनांमुळे कधी कधी महिलांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण होते. दरम्यान जळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी घराबाहेर कपडे धुत असणाऱ्या विवाहित स्त्रीने समोर उभ्या असलेल्या तरुणांना बाजूला सरण्यास सांगितले. त्यावेळी “तू काय माधुरी दीक्षित ( Madhuri Dikshit) आहेस का? तुला एक दिवस उचलून घेऊन जाईन” अशी धमकी देत त्या दोन तरुणांनी महिलेचा विनयभंग केला. ( Woman get molested in Jalgaon)
Gautami Patil | सेलेब्रिटींसाठी गौतमी पाटील नॉट रीचेबल ! नक्की काय आहे प्रकरण ?
जळगाव जिल्ह्यातील रावेळ तालुक्यात ही घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केली असून आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. एक आठवड्यापूर्वी ( ता.१०) पीडित महिला घराच्या ओट्यावर कपडे धुवत होती. यावेळी युनूस सायबू तडवी व इरफान नामदार तडवी हे दोघेही तिथेच समोर बोलत उभे राहिले. यावर विवाहिता त्या दोघांना म्हणाली की, ” तुम्ही दोघेही इथे उभे राहिलात तर तुमच्या अंगावर पाणी उडेल. त्यामुळे बाजूला व्हा..”
मोठी बातमी! क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल, WTC Final मध्ये ‘या’ तीन नियमांचा समावेश; जाणून घ्या…
यावर युनूस विवाहितेकडे पाहत म्हणाला की, ” आता तर फक्त पाहत आहे, तू काय माधुरी दिक्षीत आहेस का ? एक दिवस तुला उचलून घेवून जाईन.” यावेळी युनूस सोबत असलेल्या इरफान यानेही युनूसच्या बोलण्यात होकार मिळवत विवाहितेला त्रास दिला. या दोघांनीही विवाहितेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच शिवीगाळ करत विवाहितेचा धमकी देखील दिली. दरम्यान विवाहितेने घटना घडल्यानंतर चार दिवसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.