मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या चार नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Four killers who stripped women naked in Manipur, smiled at the police

मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Manipur Viral Video) झाल्याने देशभरात चांगलीच संतापाची लाट पसरली आहे. ही दोन महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. परंतु या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

दरम्यान, आता या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या मदतीने पोलिसांकडून त्याला थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंड देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बिरेन सिंह (Biren Singh) यांनी दिली आहे.

Maharashtra rain । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी

दरम्यान, मणिपूर पोलिसांकडून या प्रकरणी अपहरण, साामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय इतर आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी 12 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

अभिमानास्पद! इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या मदतीला निघाला ‘लालबागचा राजा’

Spread the love