Accident News । लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला! नवरदेवासह चारजण जागीच ठार

Accident News

Accident News । देशात दररोज अनेक अपघात घडत असतात. यात अनेकांचा जागीच जीव जातो शिवाय अनेकांना कायमचे अपंगत्व येते. बरेच अपघात (Accident) चालकांच्या चुकीमुळे होतात. यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होतात. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रॉलीच्या अपघातात नवरदेवासह चारजण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Mumbai Crime News । वृद्ध महिलेच्या घरातून सुरू होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी केली धडक कारवाई अन् घटना वाचून बसेल धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील मोगा या ठिकाणी एक भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. एक कार सुखबिंदर सिंह फाजलिका ते बदोवाल लुधियानाला लग्नाची वरात चालली होती. या कारमध्ये ड्रायव्हरसोबतच नवरा मुलगा आणि इतर लोक होते, अजितवालजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॉलीवर जाऊन कार जोरात आदळली. हा अपघात इतका भयानक होता. ज्यात या लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक जखमी झाला.

Saath Nibhana Saathiya । आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्रीचं निधन

उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. चालकाला उपचारासाठी मोगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे. मोगा लुधियाना रोडवर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वर आणि वधू पक्षाच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका झटक्यात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले.

Gram Panchayat Elections 2023 । मोठी बातमी! राज्यात आज 2 हजार 369 ग्रामपंचायतींमध्ये रिक्त सरपंचपदासाठी मतदान

Spread the love