
Crime News । यवतमाळ : रागाच्या भरात कोण काय करेल? याचा काही भरोसा नाही. अलीकडच्या काळात गुन्ह्यात (Crime) वाढ झाली आहे. प्रशासनाला देखील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालता येत नाही. यामुळे कित्येकांचे संसार उध्वस्त होत आहेत. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयानं चक्क सासरचं संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. (Latest Marathi News)
Donald Trump । कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! लढवता येणार नाही निवडणूक; कारण…
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) घडली आहे. आरोपी गोविंद पवार हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गोविंद पत्नीला सतत मारहाण करत होता. अखेर गोविंदच्या जाचाला कंटाळून पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहत होती. याच कारणावरून गोविंद सासरच्या व्यक्तींना भांडत होता.
Maharashtra Covid Update । महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला! मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद
चारित्र्याच्या संशयावरून गोविंद पवारने लोखंडी रॉडेने वार करत सासरा, दोन मेव्हणे आणि बायकोची हत्या केली आहे. या घटनेत सासू रुखमा भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गोविंद पवारला अटक केली आहे. अधिक तपास या प्रकरणाचा सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Pune News । पुणे हादरलं! भाजप युवा नेत्याची रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या, नेमकं कारण काय?