
अगामी मुंबई महापालिका निवणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी सुद्धा या पार्श्वभूमीवर आपले प्लॅन्स आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यातील एक मोठा मतदारवर्ग आपल्या बाजूला करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्यासाठी राज्य सरकारकडून पुढाकार घेतला जाणार आहे.
मकर संक्रांतीनिमित्त ‘या’ गावात पतंग उडवण्यास बंदी!
यासाठी एसटी महामंडळाची मदत घेतली जाणार असून, राज्यातील एक कोटी जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून दोन हजार एसटी बसेस ( ST Bus) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिन्याच्या प्रत्येक शनिवारी – रविवारी जेष्ठ नागरिकांसाठी ही संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व प्रसिद्ध तिर्थस्थळांना भेट देण्यासाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे.
बिग ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे, आदेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यामध्ये पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी,शेगाव, कोल्हापूर -जोतिबा दर्शन या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये प्रवासाचा खर्च सरकार करणार असले तरी, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च मात्र नागरीकांनाच करावा लागणार आहे.
‘या’ राजकीय महानाट्याचे सुद्धा फडणवीसच सूत्रधार; म्हणून तर सत्यजित तांबेंनी पाहिले आमदारकीचे स्वप्न!