खडकी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड यांच्या वतीने खडकी (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत आज बुधवार (दि. २८) रोजी रब्बी पिक प्रात्यक्षिक (पौष्टिक तृणधान्य पिक रब्बी ज्वारी) बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
Narendra Modi: मोदी सरकारचा देशवासीयांना मोठा दिलासा! ‘या’ योजनेची वाढवली मुदत
हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय खडकी या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी खडकी गावच्या नवनियुक्त सरपंच सौ.सविता दत्तात्रय शितोळे, उपसरपंच श्री.राहुल गुणवरे, भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.महेश शितोळे, माजी जि.प.सदस्य श्री.संजय काळभोर, मा. सरपंच श्री.किरण काळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.रघुनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्या सौ.राणी आरेकर याचबरोबर गावातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ कारणांमुळे कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी श्री.राहुल माने व कृषी सहाय्यक श्री.शंकर कांबळे यांच्या माध्यमातून पार पडला.
MPSC: एमपीएससीकडून तीन महिने आधीच 2023च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कारण…