मागच्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
कांद्याला भाव नसल्याने संतापून शेतकऱ्याने कांद्यावरच काढले नरेंद्र मोदींच चित्र
आता यामध्येच पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना, जो योग्य पद्धतीने धडा शिकवेल, त्याला मोफत गुवाहाटी ट्रिप भेट म्हणून दिली जाईल असे पोस्टर पोस्टर पाहायला मिळत आहेत. सध्या या पोस्टरची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न करणाऱ्या तरुणाबाबत भयानक सत्य समोर; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
या फ्लेक्सवर लिहिण्यात आले आहे की, “जी कोणी पहिली व्यक्ती छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल. त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप भेट म्हणून दिली जाईल, त्याचबरोबर कामाख्या देवीचे दर्शन देखील दिले जाईल. असे या फ्लेक्सवर लिहिण्यात आले आहे.
नाशिकच्या महंतांच शरद पवारांना आव्हान; म्हणाले, “दत्त उपासना करा”