Menstrual cycle | पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये शेवटच्या टोकावर असलेले सिंगापूर (Singapore) आणि हारपूड (Harpud) हे गाव आहे. भारताला स्वातंत्र प्राप्त होऊन आता 73 वर्ष उलटून गेली आहेत तरीही विकासाच्या प्रवाहातून काही गावे अजूनही आली तर आहेत. यामध्ये पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील सिंगापूर आणि हारपूड या गावांचाही समावेश होतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे समाजकार्य विभाग यांच्या वतीने समाजकार्य च्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण अध्ययन शिबिर हारपूड आणि सिंगापूर या गावांमध्ये आयोजित करण्यात आले होते. (Latest Marathi News)
Pune Crime । धक्कादायक! शारीरिक संबंधास नकार दिल्याने डोक्यात घातला रॉड, महिलेचा जागीच मृत्यू
या अंतर्गत युगविकास सामाजिक संस्था यांनी दिनांक १४-१२-२०२३ रोजी ग्रामीण अध्ययन शिबिरामध्ये हारपुड ग्रामीण भागातील किशोवयीन मुलींसाठी मासिक पाळी या सामाजिक विषयावर मैत्री मासिक पाळीशी (Friendship with menstruation) या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणीवजागृती सत्र घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश यादव यांनी केली. युग विकास सामाजिक संस्थेच्या वतीने राणी लोखंडे यांनी मासिक पाळी या विषयावर सत्र घेतले.
Libya । भीषण दुर्घटना! स्थलांतरितांना नेणारं जहाज बुडालं, 61 जणांचा मृत्यू
या मध्ये मासिक पाळी संदर्भात असलेल्या गैरसमजुती, मासिक पाळीदरम्यान शरीरात होणारे भावनिक, शारीरिक आणि मानसिक बदल, मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी या संदर्भात हारपुड गावातील किशोरवयीन मुली, समाजकार्य विभागाचे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. युग विकास सामाजिक संस्था ही पुणे जिल्ह्यातील आदिवासी गावातील किशोरवयीन मुली आणि महिला यांच्यासोबत मासिक पाळी या विषयावर जाणीवजागृती करण्याचे कार्य मागील एक वर्षापासून करत आहे.
Covid19 Sub Variant । कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं वाढलं टेन्शन! दोघांचा मृत्यू
या सत्रा चा समारोप डॉक्टर कार्तिक सोबत मॅडम यांनी केला. गावातील किशोरवयीन मुली व महिला यांनी या सत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला. युग विकास सामाजिक संस्थे कडून राणी लोखंडे, स्वप्नील पाटोळे आणि योगेश लिमशेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश यादव, प्राध्यापिका डॉक्टर कार्तिकी सुबकडे , भाग्यश्री मॅडम ,समाजकार्य विभागाचे एम एस डब्ल्यू चे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, हारपुड गावचे समस्त गावकरी आणि सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.
Kamalnath । मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना मोठा फटका! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू