जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. बऱ्याचदा बिबटे, लांडगे, साप, वाघ यांसारखे प्राणी मानवी वस्तीमध्ये प्रवेश करून हल्ला करता. यामुळे माणूस व शेळी, कुत्रा, मांजर यांसारख्या इतर पाळीव प्राण्यांना धोका निर्माण होतो. कोल्हापूर ( Kolhapur) येथील उदगिरीच्या जंगलाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका आईसमोर बिबट्या मुलीला घेऊन जंगलात गेला. यावेळी आईने घाबरून जोराचा हंबरडा फोडला होता. या मुलीचे नाव मनिषा डोईफोडे असे आहे.
धक्कदायक! सिक्कीममध्ये लष्कर गाडीचा अपघात होऊन १६ भारतीय जवानांचा मृत्यू
उदगिरी जंगलात केदारलिंगवाडी हे छोटेसे गाव आहे. या वाडीच्या आजूबाजूला पूर्णतः जंगलाचा परिसर आहे. सकाळच्या सुमारास मनिषा डोईफोडे आणि तिची आई या जंगलात जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची जनावरे जास्त असल्यामुळे एका बाजूला मनिषा आणि दुसऱ्या बाजूला आई होती. यावेळी जंगलात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मनिषाच्या अंगावर जोराची झडप घातली. दरम्यान, मनिषाच्या गळ्यावर हल्ला केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
महाराष्ट्र कर्नाटक सीमवाद आणखी भडकणार? कर्नाटकच्या विधानसभेत सीमावादावर घेतला ‘हा’ निर्णय
यावेळी मुलगी शांत का आहे ? म्हणून आई मुलीला शोधू लागली. यावेळी बिबट्या ( Leopard) मुलीला जंगलात घेऊन जात असल्याचे दिसले. हे पाहताच आईच्या मुलीने जोराने आरडाओरडा सुरू केला. तेव्हा बिबट्या मुलीचे मृत शरीर जंगलात ठेऊन पसार झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच वनरक्षक विभातातील लोक देखील आले होते.
कोरोनाने घातले थैमान! राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरात आजपासून मास्क सक्ती