मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात एक नवीन अभियानाचा शुभारंभ होत आहे. आता राज्यभरात फोनवर किंवा प्रत्यक्षात संवाद साधताना ‘हॅलो’ऐवजी “वंदे मातरम्” म्हणण्याचे अभियान सुरु होत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ वर्धा येथे होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात हे अभियान राबवण्याचा निर्धार संस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.
Chandni Chowk: पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त
स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्” नी सर्व शासकीय कार्यालयातील फोनवरील संभाषणाच्या (conversation) सुरुवातीस व्हावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले आहे.
Milk: दुधाला FRP चं धोरण लागू करा, शेतकरी संघर्ष समितीची नव्या सरकारकडे मागणी
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये फोनवर किंवा प्रत्यक्ष संवाद साधताना त्याची सुरुवात “वंदे मातरम्” या संबोधनाने झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल, त्याचबरोबर यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) देखील नमूद करण्यात आली आहेत.