काही दिवसांपूर्वी कसब्याची पोटनिवडणूक पार पडली. निवडणुकीबरोबरच चर्चा सुरु होती ती म्हणजे गिरीश बापटांचं आजारी अवस्थेत प्रचारासाठी उतरणं गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांनी. वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजकारणात नेहमी चर्चेचा विषय राहिलेले पुण्याचे गिरीश भाऊ बापट नेमके कोण होते हे जाणून घेऊयात..
आता मला बापासारखी माया कोण देणार? गिरीश बापटांच्या निधनानंतर अभिनेत्री भावुक
पुण्यातील लोकांच्या मनात गिरीश भाऊ म्हणून आदराचं स्थान मिळवणाऱ्या बापटांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी तळेगाव दाभाडे येथे झाला. कोणताही राजकारणाचा वारसा नसणाऱ्या बापटांनी कामगारसंघटनेंच्या माध्यामातून राजकारणात प्रवेश केला. 1983 ला पुणे महापालिकेत बापटांची नगरसेवकपदी नेमणूक झाली. पुढे ३ वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले. 1993 ला मात्र बापटांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. 1993 ला झालेल्या कसबा पेठेतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव झाला. त्या पराभवानंतर 1995 पासून गिरीश बापटांनी राजकाणात ची मुसंडी मारली ती नक्कीच उल्लेखनीय होती असं म्हणलं तरी काही हरकत नाही. याचं कारण म्हणजे 1995 ला बापट पहिल्यांदा भाजपचे आमदार झाले आणि त्यानंतर कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा बापट आमदार म्हणून विजयी झाले.
कसब्यामध्ये पुन्हा पोटनिवडणूक होणार का? जाणून घ्या…
राजकारणात नेते येतात जातात मात्र गिरीश बापट हे राजकारणापलीकडे पाहणारे व्यक्तीमत्व होते असं सांगितलं जातं. त्यामुळेच लोकांनी त्यांना साथ दिली. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून देखील बापटांनी काम केलं. 2019 ला प्रचंड मतांनी विजयी होत बापट पुण्याचे खासदार ठरले.
अन् त्याने चक्क सापाच्या अंगावर पाणी ओतलं; पुढे घडलं असं की…, पाहा थरकाप उडवणारा Video
त्यानंतर बापटांच्या प्रकृतीनं त्यांची साथ सोडली. राजकारणात प्रत्येक गोष्टीत सक्रिय असणारे बापट आरोग्याच्या तक्रारीमुळं बॅकफूटवर आले. अनेक दिवसांपासून बापटांवर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानादेखील पक्षासाठी स्वताला झोकून देणारे बापट कसब्याच्या पोटनिवडणुकीत नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घेऊन भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ उतरले आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात हा विषय चर्चेचा ठरला. भाजपवर यावरून तीव्र टीका झाली. पण गिरीश बापट हा राजकारण जगणारा, राजकारणातच जिवंत राहणारा खरा लढवय्या नेता आहे, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं.
राखीनं उडवली मलायकाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल
आता मात्र पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते असणारे गिरीश बापट कालवश झाले. एका साध्या कंपनीत कामगार म्हणून काम करणारा ही व्यक्ती खासदारकी पर्यंत जाऊन पुण्यातील लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करण्याची बापटांची राजकीय कारकीर्दी उल्लेखनीय आहे.