Gadar 2 | प्रदर्शित होण्याअगोदरच ‘गदर 2’चा बंपर धमाका; विकली गेली तब्बल ‘इतकी’ तिकीट

'Gadar 2' bumper bang ahead of release; So many tickets have been sold

Gadar 2 | गदर 2 हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. येत्या 11 ऑगस्ट रोजी गदर 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल हे दोघं या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर 11 ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा बहूचर्चित चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुण्यात फिरायला जात असाल तर नक्की खा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

त्यामुळे या दोन्ही चित्रपटांसाठी ॲडव्हान्स बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत या चित्रपटांच्या ॲडव्हान्स तिकिटांची बुकिंग चांगल्या पद्धतीची झाली आहे. मात्र अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटाला धमाकेदार ओपनिंग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घालेल असे देखील बोलले जात आहे.

Genelia’s birthday । जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला..

बॉक्स ऑफिसच्या गणिताचा हिशोब करणारी वेबसाइट sacnilk ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी गदर 2 या चित्रपटाची तब्बल 90 हजार 885 तिकिटं विकली गेली आहेत. या आकड्यानुसार चित्रपटाने शुक्रवारी जवळपास 2.42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात या चित्रपटाचे तिकीट मोठ्या प्रमाणात बुकिंग होण्याची शक्यता आहे.

Salman Khan । भाईजानलाही ‘बार्बी’ची भुरळ! हटके लूक पाहून नेटकरी कोड्यात, पहा व्हायरल व्हिडिओ

हा चित्रपट ओपनिंग पर्यंत जवळपास दहा कोटी रुपयांपर्यंत गल्ला जमवणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या चित्रपटाबद्दल पाहिले तर अक्षय कुमारच्या चित्रपटाची 12000 तिकीट विकली गेली आहेत.

Pune Metro । पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे मेट्रो आणखी चार मार्गांवर धावणार; जाणून घ्या कोणते ते मार्ग?

Spread the love