
पुणे : कोणत्याही शहरात जायचं म्हणल तर पहिला प्रश्न भेडसावतो तो म्हणजे ट्रॅफिक. दरम्यान ट्रॅफिकची ही समस्या मोठ मोठ्या प्रत्येक शहरात जाणवते. म्हणून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच महानगर पालिका आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असताना दिसत आहे. दरम्यान केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर भन्नाट उपाय सांगितला आहे.
नितीन गडकरी यांनी चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं. तसेच पुढे गडकरी म्हणाले की, पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली तर पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असं गडकरी म्हणाले आहेत.
शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी; शेततळे बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान
चार मजली रस्त्यांची योजना!
पुण्यातील सातारा रस्त्यावरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार असल्याचं गडकरी म्हणाले.
“खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. म्हणजेच सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.
पुणे-बंगळुर फक्त साडेतीन तासांत!
पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग उरसे नाक्यावरून सुरू करणार असून त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारं ट्रॅफिक तिथूनच वळून जाईल अस गडकरी म्हणाले. त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासांत पूर्ण होईल. या रस्त्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा फायदा होईल”, असं गडकरी म्हणाले.
दिलासादायक! अखेर पीएम किसान योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार
उडती बस आणि ट्रॉली बस!
उडती बस आणि ट्रॉली बस बाबत नितीन गडकरी म्हणाले की, “आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून ट्रॅफिक गेलं, तर त्याचा फायदा होईल.
Nitin Gadkari: नितीन गडकरींची मोठी घोषणा! पुण्यातील चाकणजवळ उभारले जाणार MMLP पार्क
दुसरा पर्याय ट्रॉली बसचा आहे. त्यात दोन बस जोडल्या जातील आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. या ट्रॉलीबसची किंमत ६० लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. जर पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो”, असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं.