Maharashtra politics । राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची जोरात तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. अशातच काँग्रेस (Congress) पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बड्या नेत्याने काँग्रेसला रामराम ठोकला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. (Latest marathi news)
Ajit Pawar । विरोधकांना बसणार धक्का! लोकसभेत विजयी होण्यासाठी अजितदादांची सर्वात मोठी खेळी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गज्जू यादव (Gajju Yadav) यांनी राजीनामा दिला आहे. ते 2019 मध्ये रामटेकमधून काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार होते. अशातच आता गज्जू यादव हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, यापूर्वीही कॉग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तर दुसरीकडे मिलींद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अशातच आता गज्जू यादव यांनी देखील पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
MI vs CSK । लाईव्ह मॅचमध्ये रोहित शर्माची फिटली पँट; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल