Mumps Galgund । मुंबई : सध्या वातावरणात बदल होताना पाहायला मिळत आहे. दिवसभर उकाडा आणि सकाळी तसेच रात्री थंडी जाणवू लागली आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम (Health Effect) होत आहे. अशातच आता शहरात गालगुंडची साथ पसरू लागली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या आजाराच्या (Galgund illness) लक्षणांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. (Latest Marathi News)
BJP । भाजपला मोठा धक्का! पत्रकार परिषद घेत बड्या अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
मुंबई परिसरात आता गालगुंडसारख्या आजारासाठी (Galgund Risk In Mumbai) कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काही जणांना बहिरेपणाचा त्रास होत आहे. जरी हा गालगुंड आजार असला तरी तो सामान्य संसर्गाप्रमाणे नाही तर तो नवीन पद्धतीचा आहे, ज्याच्या लक्षणांपासून परिणामांपर्यंत खूप गोष्टी वेगळ्या आहेत. (Mumps Galgund Risk In Mumbai)
Slap PM । गळ्यात पुष्पहार टाकायच्या निमित्ताने आला अन् थेट माजी पंतप्रधानांच्या कानशिलात लगावली
खरंतर हा आजार लहान मुलांमध्ये आढळून येतो. परंतु, प्रौढांमध्ये देखील या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मागील 20 दिवसांमध्ये रोज शहरात गालगुंडचे 7 ते 8 रुग्ण दिसत आहे. यात 35 ते 40 वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. यावर जर वेळीच उपाय केले नाही तर नस बाधित होऊन कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका आहे.
अशी घ्या काळजी
- तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.
- हा संसर्गजन्य आजार असल्याने समजा तो झाला तर मुलांना शाळेत पाठवू नका
- मधूमेह, रक्तदाब किंवा इतर सहव्याधी असल्यास काळजी घ्या
- गालगुंड झालेल्या जागी हलका मसाज करा.
- गालाखाली गरम पाण्याचा शेक घ्या.
Shreyas Talpade । मोठी बातमी! शूटिंगवरून परताना श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल