अलीकडे देशात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे उत्तर प्रदेशामध्ये घडतात असं प्रमाणित झालं आहे. परंतु आता त्या पाठोपाठ दिल्लीतही गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. दिल्लीतील जाफराबाद परिसरात अशीच एक गुन्हेगारीची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी या परिसरात चार जणांवर गोळीबार झाल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे.
जाफराबादमधील गल्ली क्रमांक 38 मध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये कैद झाली आहे. हमजा नावाचा एक तरुण त्याच्या घराबाहेर त्याच्या मित्रांसमवेत बसला असताना हल्लेखोर बाईकवर आले आणि त्याच्यांवरती अचानक गोळीबार केला. या अंधाधुंद गोळीबारात ते चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत, आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठी बातमी! रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
या जखमी तरुणांना जग प्रवेश चंद्र रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, त्यांची स्थिती खूप नाजूक असल्यामुळे त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अंदाधुंद गोळीबारीची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, त्या आधीच आरोपी फरार झाले होते. या हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला जात आहे.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 10 जूनपर्यंत इंटरनेट बंदी
जखमी झालेल्या तरुणाची आई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असं सांगितलं आहे की, माझ्या दोन्हीही मुलांना गोळी मारली, त्यांची कोणाशीही दुश्मनी नाही. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, त्या चौघांपैकी एक जण नुकताच जेलमधून बाहेर आला होता. हल्लेखोरांचा त्या तरुणावरच डोळा होता.
Odisha Train Accident । रेल्वे अपघातात प्राथमिक चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती